दिव्यामध्ये बेकायदेशीर माती वाहतूक सुसाट

Maharashtra WebNews
0

महसूल विभाग झोपेत  

दिवा, (आरती मुळीक परब) : दिवा शहर व परिसरात शासनाचा महसूल बुडवून बेकायदेशीर माती वाहतूक होत असल्याचे दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा, दोस्ती, एकता नगर, भोईर कंपाऊंड, मनिर कंपाऊंड, डावले, खर्डी, कल्याण फाटा, दिव्यामध्ये साबे गाव, डि जे कॉम्प्लेक्स, मुंब्रा देवी कॉलनी, गणेश नगर, बेडेकर नगरमध्ये बेकायदेशीर माती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम महसूल विभाग कधी घेणार ? असे प्रश्न आता नागरिक करत आहे.

डंपर, ट्रॅक्टरमध्ये मातीच्या भरलेल्या गाड्या, दिवस- रात्र चालू आहेत. हे महसूल विभागाला दिसत नाही का? झोपलेले प्रशासन हे कधी जागे होणार, असा प्रश्न दिव्यातील नागरिक आता विचारात आहेत. डंपर वाहन चालक जास्त जास्त फेऱ्या व्हावे म्हणून अति वेगाने वाहन चालवत असल्याचेही दिसून येत आहे. ह्या अवजड वाहतूकीमुळे दिव्यात बरेच अपघात ही घडलेले आहे. ही वाहतूक दिवा शीळ मार्गाने होत असून तो रस्ता निर्माणधीन असल्याने तेथून वाहतूक करताना मोठ मोठ डंपर छोट्या वाहनांना धडक देऊन जास्त जलद गतीने प्रवास करत आहेत. त्यामुळे मोठा अपघात घडल्यास त्याला जबाबदार महसूल खाते असेल. 

ही माती अन्य ठिकाणावरुन आणून खाडीकिनारी असलेल्या शेतामध्ये भरणी केली जात आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अडवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याभागातील नागरिकांच्या घरात पाणीही भरण्याची शक्यता आहे. दिवा प्रभाग समितीचे अधिकारी, प्रांत अधिकारी, रॉयल्टी अधिकारी, लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. या मातीच्या प्रत्येक गाडीमागे आठ हजार घेतले जात असल्याची चर्चा दिव्यातील नागरिकांमध्ये आहे. हे चाललेले प्रकार कधी थांबणार, असं आता दिवेकर म्हणत आहेत. आता तरी जिल्हाधिकारी दखल घेणार का? संबंधितांवर कारवाई कधी होणार? असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. 

 


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)