शिवमिरवणुकीदरम्यान १५ मुलांना विजेचा झटका

Maharashtra WebNews
0

मुलांची स्थिती गंभीर 

कोटा :  राजस्थानमधील कोटा शहरात महाशिवरात्रीनिमित्त काढण्यात आलेल्या शिव मिरवणुकीदरम्यान विजेचा शॉक लागल्याने १५ मुल भाजल्याचा घटना घडली आहे. एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व मुलांना एमबीबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

काली बस्ती येथे दरवर्षी शिव बारात आयोजित केली जाते. दुपारी १२.३० च्या सुमारास कुन्हडी थर्मल चौकाजवळ हा अपघात झाला. शिव मिरवणुकीत अनेक लहान मुलांनी धार्मिक झेंडे घेतले होते. यावेळी एका ध्वजाने उच्च विद्युत दाहिनीला स्पर्श केला. त्यामुळे हा अपघात झाला. या घटनेनंतर अचानक गोंधळ उडाला. अनेक मुल विव्हळत असताना मुलांना एमबीबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले.  तेथील एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.  अपघाताची माहिती मिळताच वैद्यकीय पथकाला सतर्क करण्यात आले. जखमी मुलांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात पोहोचलेल्या आयोजकांना मारहाण केल्याचे देखील समोर आले आहे. आयजी रविदत्त गौर यांनी सांगितले की, एक मूल ७० टक्के तर दुसरे ५० टक्के भाजले आहे. उर्वरित मुले १० टक्के भाजली. मुलांचे वय नऊ ते १६ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्याचे ऊर्जामंत्री हिरालाल नागर आणि इतर अधिकारीही एमबीबीएस रुग्णालयात पोहोचले. पत्रकारांशी बोलताना बिर्ला म्हणाले की, ही घटना अत्यंत दुःखद आहे. हे का घडले याचा तपास केला जाईल. सर्वजण सध्या मुलांच्या उपचारात गुंतले आहेत. एक मुलगा गंभीर आहे. रेफरलची गरज भासल्यास तेही केले जाईल. मुलांना शक्य तितके सर्वोत्तम उपचार दिले जातील.

 काली बस्ती येथे दरवर्षी शिव बारात आयोजित केली जाते. शिव मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी बहुतांश मुले कुटुंबीयांशिवाय आली होती. आयोजकांच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. या कारणावरून आयोजक रुग्णालयात पोहोचले असता संतप्त कुटुंबीयांनी त्यांना बेदम मारहाण केली.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)