दिवा, (आरती मुळीक परब) : दिव्यात इच्छतेश्वर शिवशक्ती मंदिरात गेली ३६ वर्षांपासून सुरु असलेला महाशिवरात्रीचा उत्सवात लाखो भाविक दर्शन घेतात. १९८८ मध्ये इच्छतेश्वर शिवशक्ती मंदिराची स्थापना ब्रम्हा पाटील यांनी केली असून मंदिर आता बरेच नावारुपाला आले आहे. हे मंदिर बनविताना ब्रम्हा पाटील यांना बऱ्यात अडचणींना सामोरे जावे लागले होते. पण आता दिव्याचे शहरीकरण झाल्याने महाशिवरात्रीसाठी लाखोंच्या संख्येत भक्तगण दर्शनास येतात.
महाशिवरात्री निमित्त मंदिरात बालोपासना, ज्ञानाई हरिपाठ मंडळ- आगासन यांचे भजन, संत श्रीपाददास ह.भ.प.श्री. नारायण महाराज भोईर- दिवा यांचे भजन, संत श्रीपाददास ह. भ. प. श्री. डॉ कुणाल महाराज म्हात्रे– डोंबिवली यांचे भजन, परमपूज्य कलावली आई यांचे भजन, महाआरती, श्री. ठाणेश्र्वर भजन मंडळ- दिवा यांचे भजन व रात्री १२.०० वाजता शिव पालखी काढण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पासूनच भक्त या मंदिरात दर्शनासाठी रांगा लावत असल्यामुळे त्यांच्यासाठी चहा व अल्पोपहारची सोय मंदीर समितीचे अध्यक्ष चरण पाटील यांच्या तर्फे दरवर्षी केली जाते. या महाशिवरात्री निमित्त शिवशक्ती मित्रमंडळ, दिवा फाऊंडेशन, दिवा ग्रामस्थांसह शेकडो स्थानिक रहिवाशी दिवसरात्र नियोजन केले आले.