डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरात देशी दारू बनविण्याचा स्टँडवर छापा टाकून मानपाडा पोलिसांनी ३५ लिटर दारूने भरलेला ड्रम नाल्यात ओतून दारू बनवण्याचे साहित्य नष्ट केले.
मिळालेल्या माहितीनुसार, दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या नीलेश पाटील (२६) याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिस आयुक्तांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध दारू, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशावरून मानपाडा पोलिसांचे पथक शहरातील अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत होते.
यावेळी पोलीस शिपाई प्रशांत आंधळे यांना कोळेगाव येथील समाधान हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या नाल्याजवळ अंदाधुंद देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती. आंधळे व त्यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.या कारवाईत पोलिसांनी ३५ लिटर दारूने भरलेला ड्रम नाल्यात ओतून दारू बनवण्याचे साहित्य नष्ट केले.