अभिजीत बांगर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी

ठाणे : निवडणूक आयोगाने मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त यांची बदली करण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्य सरकारने ठाणे महापलिकचे आयुक्त अभिजीत बांगर (Abhijit bangar) यांची तडकाफडकी बदली करून त्यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती केली. मंगळवारी राज्य सरकारचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी ऑर्डर काढली.  ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जागा रिक्त झाल्याने नवी नियुक्ती कुणाची होती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अभिजीत बांगर यांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी पालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकरला होता. ते फक्त १५ महिने या पदावर राहिले विशेष म्हणजे नियमानुसार जिल्ह्यात एका पदावर तीन वर्षे राहता येते ते यापूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर होते, त्यामुळे अभिजीत बांगर यांची बदली होणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती.

जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने आपली बदली होणार याची जाणीव त्यांना होती त्यामुळे यंदाचा पालिकेचा अर्थसंकल्पही घोषित करण्यास ते तयार नव्हते मात्र मार्च उजडला आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची वेळ आल्याने त्यांनी या महिन्यात ७ मार्च रोजी पालिकेचा अर्थसंकक्ल्प जाहीर केला. मात्र ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post