Loksabha election 2024 : बिहारमध्ये भाजप १७ जागांवर लढणार

 


पटना :  बिहारमधील जागा वाटपाबाबत सोमवारी संध्याकाळी दिल्लीत एनडीएकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. बिहार भाजपचे प्रभारी विनोद तावडे यांनी बिहार एनडीएमध्ये जागावाटपाची घोषणा केली. बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष १७ जागांवर, जनता दल युनायटेड १६ जागांवर आणि लोक जनशक्ती पार्टी पाच जागांवर तर हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी एक जागा लोकसभा निवडणूकीत लढवणार असल्याचे जाहीर केले.

बिहार भाजपचे प्रभारी विनोद तावडे म्हणाले की, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, औरंगाबाद, अररिया, मधुबनी, दरभंगा, मुझफ्फरपूर, महाराजगंज, सारण, उजियारपूर, बेगुसराय, नवादा, पटना साहिब, पाटलीपुत्र, आराह, बक्सर यासह १७ जागांवर भाजप विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला. 

JDU वाल्मिकी नगर, सीतामढी, शेओहर, झांझारपूर, सुपौल, किशनगंज, कटिहार, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, जेहानाबाद आणि सिवानमधून निवडणूक लढवणार आहे. LJP (RA) वैशाली, हाजीपूर, समस्तीपूर, खगरिया आणि जमुई या जागांवर निवडणूक लढवणार आहे. मांझी यांचा पक्ष गया येथून तर उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष करकट मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. 

जागावाटपाची घोषणा करण्यापूर्वी विनोद तावडे म्हणाले की, पक्षांची निवडणूक चिन्हे वेगळी असली तरी एनडीएचे सर्व पक्ष सर्व ४० जागांवर आपली पूर्ण ताकद लावतील. आम्ही ४० पैकी ४० जागा जिंकू असा विश्वास व्यक्त देखील तावडे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, लोजपचे प्रदेशाध्यक्ष राजू तिवारी म्हणाले की, लोजपला (रामविलास) पाच जागा मिळाल्या आहेत. मी पंतप्रधान मोदी आणि भाजपसह सर्व पक्षांचे आभार मानतो. जेडीयूचे खासदार संजय झा म्हणाले की, जेडीयूला १६ जागा मिळाल्या आहेत. २०२४ च्या निवडणुकीत NDA बिहारमध्ये ४० पैकी ४० जागा जिंकेल.

Post a Comment

Previous Post Next Post