खडवलीत भातसा नदी किनारी असलेल्या हॉटेल व ढाब्यांना आग

 पर्यटकांची धावपळ

कल्याण, (शंकर जाधव) : ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांचे आवडते पर्यटक केंद्र म्हणून ओळख असलेले खडवली येथील भातसा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या हॉटेल व ढाब्याला काल दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली.  

या आगीमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. पर्यटक जीव वाचवण्यासाठी धावपळ करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणची माहिती अग्निशामक दलाला लवकर न मिळाल्याने प्राथमिक स्तरावर गावकऱ्यांनीच नदीच्या पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. 

 मात्र जोराचा वारा वाहत असल्याने आगीवरती नियंत्रण मिळवणे कठीण होत होते. अखेर काही लोकांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. 

 या घटनेने पुन्हा एकदा पर्यटक ठिकाणावर सुरक्षा सामुग्री हॉटेलचालक, ढाबेचालक बाळगत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post