रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा इशारा
रशिया: रशियाचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य धोक्यात आल्यास आपण युक्रेनविरोधात अण्वस्त्रांचा वापर करण्यास तयार असल्याचा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे. संयुक्त मुलाखतीदरम्यान, राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की त्यांना आशा आहे की युनायटेड स्टेट्स अणुयुध्दाला कधीही प्रोत्साहित करणार नाही, मात्र असे झाल्यास रशियाची अणुशक्ती यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
युक्रेनविरोधात अण्वस्त्रांच्या वापरावर विचार करण्याच्या प्रश्नावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, त्यांची (अण्वस्त्रांची) येथे गरज नाही. मॉस्को युक्रेनमध्ये आपले उद्दिष्ट पूर्ण करेल असा दावा त्यांनी केला. पुतिन म्हणाले की, त्यांनी चर्चेसाठी नेहमीच दरवाजे उघडे ठेवले आहेत. पुतीन म्हणाले की, पाश्चात्य देशांसोबत कोणताही करार करताना ठोस हमी देण्याची गरज अधिक आहे. अलीकडेच पुतिन यांनी पाश्चात्य देशांना धमकावून सांगितले की, आमच्याकडे अशी शस्त्रे आहेत जी त्यांच्या भागातही घुसू शकतात.
दोन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आता अण्वस्त्र संघर्षाकडे वाटचाल करत आहे. मात्र, पंतप्रधान मोदी आणि अनेक जागतिक नेत्यांच्या सक्रियतेमुळे अणुयुद्ध टाळता येऊ शकते असा दावा एका अमेरिकन अहवालात करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या प्रशासनातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा हवाला देत सीएनएनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील संघर्ष थांबवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी बोलणी केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्याचबरोबर पीएम मोदी आणि इतर अनेक जागतिक नेत्यांच्या सक्रियतेमुळे रशियन सैन्य आणि पुतिन यांना विश्वासात घेण्यात यश आले. त्यामुळेच युक्रेनवरील अण्वस्त्र हल्ला थाांबवताा आला आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.