Kriti says : मी प्रामाणिक जीवनसाथीच्या शोधात

 


नेहा धुपिया सध्या तिच्या 'नो फिल्टर नेहा' शोमुळे चर्चेत आहे.  हा शो मागील सीझनपेक्षा खूपच वेगळा आणि चांगला आहे. तिच्या आगामी एपिसोडमध्ये क्रिती सेनन येणार असून या कार्यक्रमात क्रिती आपल्या जीवनसाथीबाबतच्या अपेक्षा काय आहे याबाबतचा उलगडा करताना आपल्याला दिसणार आहे. यामुळे क्रितीला कसा जीवनसाथी पाहीजे हे जाणून घेण्यात तिचे चाहते उत्सुक आहेत. 'नो फिल्टर नेहा'च्या या सीझनमध्ये आतापर्यंत शाहिद कपूर, टायगर श्रॉफ आणि करीना कपूर खान पाहुणे येऊन गेले आहेत. शोच्या आगामी एपिसोडमध्ये क्रिती सेनन नेहासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसणार आहे.  नेहा आणि क्रितीच्या या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  या एपिसोडमध्ये काय खास असेल ते जाणून घेऊया.

नेहा धुपिया बॉलिवूडमध्ये तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. नेहाचा तोच स्पष्टवक्तेपणा तिच्या चॅट शोमध्येही पाहायला मिळते. बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री क्रिती सेनन 'नो फिल्टर नेहा'च्या पुढच्या भागात पाहुणी म्हणून दिसणार आहे. यूट्यूबवर रिलीज झालेल्या शोच्या प्रोमोमध्ये, नेहा क्रितीला विचारते की ती जीवनसाथी कशी शोधत आहे. या प्रश्नाच्या उत्तरात क्रिती म्हणते, 'खर सांगू, माझा डेटिंग ॲप्सवर अजिबात विश्वास नाही. मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना सांगितले आहे, की मी जीवनसाथी शोधत आहे आणि त्यांनी मला त्याला शोधण्यात मदत करावी असे आवाहन देखील केले आहे. 

क्रिती सेनन आपली भावना व्यक्त करताना सांगते की, 'प्रेमाबद्दल माझी खूप जुनी विचारसरणी आहे. मला असा जीवनसाथी हवा आहे जो माझ्याशी अगदी प्रामाणिक असेल आणि माझ्यावर खूप प्रेम करेल तसेच एकनिष्ठ असणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

'नो फिल्टर नेहा' शोच्या प्रोमोमध्ये 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' स्टार क्रिती सेनन तिच्या भावी आयुष्याविषयी स्पष्टपणे बोलताना पहायला मिळणार आहे. क्रितीचे बोलणे ऐकून नेहाने 'मला असे का वाटते की तुम्ही फक्त एक नाही तर सात-आठ मुलांबद्दल बोलत आहात? असा प्रश्न केल्यावर क्रिती हसत हसत उत्तर देते, 'मी जास्त बोलत नाहीये. मला जे काही हवे आहे, या सर्व मूलभूत गोष्टी असल्याचे उत्तर दिले. 



Post a Comment

Previous Post Next Post