शरद पवार यांनी स्वर्गीय मिनाक्षी पाटील यांना वाहिली श्रध्दांजली
अलिबाग ( धनंजय कवठेकर ): माजी मंत्री मिनाक्षी पाटील यांच्या दुखःद निधनानंतर देशाचे माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी आज अलिबाग- पेझारी येथील शेकाप नेते जयंत पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले शुक्रवारी मिनाक्षी पाटील यांचे निधन झाले होते.
शरद पवार हे पत्नीसह आज उपस्थित राहून त्यांनी मिनाक्षी पाटील यांच्या तसबीरीला फुले वाहून आदरांजली वाहिली. मिनाक्षी पाटील यांनी सार्वजनिक जीवनात कष्ट करून प्रसंगी संघर्ष करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला त्यांची बरोबरी आज कोणी करू शकत नाही. त्यांचा परिवार पुरोगामी विचारांचा आहे तोच वारसा त्यांनी जपला. आज महाराष्ट्र एका कर्तृत्ववान आणि संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाला मुकला अशा शब्दांत शरद पवार यांनी भावना व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला.