Bhiwandi loksabha : भिवंडीत कपिल पाटील विरोधात सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा


लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी 

कल्याण ( शंकर जाधव ) : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्याशी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची लढत होणार असल्याचे दिसते.

शिवसेनेतून सुरेश म्हात्रे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती. धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी आपली ओळख तळागाळात निर्माण केली. २०१४ ला मनसेमधून त्यांनी भिवंडी मतदारसंघासाठी निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांच्या पारड्यात दुसऱ्या क्रमांकाची मते पडली होती. मात्र यावेळी कपिल पाटील यांनी त्यांना पराभूत केले होते. २०१९ च्या निवडणुकीतही त्यांनी कपिल पाटील यांना प्रचंड विरोध दर्शवला होता. मात्र त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत त्यांची  समजूत काढली होती.  त्यानंतर त्यांनी हा अर्ज मागे घेतला होता.  त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करत आपल्या उमेदवारीसाठी पुन्हा  दावा केला होता.

 मात्र ही उमेदवारी नेमकी कोणाकडे द्यावी यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच ही भिवंडी लोकसभेची जागा अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाली आहे.


Tags: #Bhiwandiloksabha #kapilpatil #sureshmhatre 

Post a Comment

Previous Post Next Post