वर्षा बंगला हे सत्तेचे केंद्रस्थान

 


वर्षा बंगल्यावर हेमंत पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करणे हे कितपत योग्य आहे याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे

        राष्ट्रवादी शरद पवार गटाचे  प्रवक्ते महेश तपासे

डोंबिवली ( शंकर जाधव ) : एवढ्या मोठी नामुष्की शिवसेना शिंदे गटावर आली आहे. हिंगोली मतदार संघाकरता उमेदवार जाहीर करता २४ तासात नंतर नाव कट करता विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट डावलतात. एवढेच नव्हे तर दोन ते तीन उमेदवार फेरबदल केले. महाराष्ट्रातील वर्षा बंगला हे सत्तेचे केंद्रस्थान आहे. हा शासकीय बंगल्यावर तिकडे राजकारण सुरु आहे. बैठका घ्यायच्या आहेत तर पक्ष कार्यालयात घ्या. वर्षा बंगल्यावर हेमंत पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करणे किती योग्य याचे उत्तर निवडणूक आयोगाने देणे आवश्यक आहे असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ( शरद पवार ) गट महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.     


   गुरुवार ४ तारखेला महाविकास आघाडीच्या कल्याण लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी प्रवक्ते महेश तपासे  आले होते. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील, कल्याण ग्रामीण अध्यक्ष काशीनाथ पाटील, निरंजन भोसले, समीर गुहाटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तपासे यांनी दरेकर यांना शुभेचा देत आम्ही सर्वजण प्रचारासाठी तुमच्या बरोबर आहोत असे सांगितले.

पत्रकारांशी बोलताना तपासे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षामधील किल्लेदार, वजनदार, वतनदार असे सगळेच गेले असून फक्त मावळे शिल्लक राहिले आहेत. याच कट्टर मावळ्यांची मदार घेऊन आम्ही निवडणुकीत काम करणार आहोत. नेते जरी गेले तरी जनता आमच्या बरोबर आहेत.

    यावेळी वर्षा या शासकीय बंगल्यावर होत असलेल्या बैठकीबाबत टीका करीत त्यांनी सांगितले की, निवडणूक काळात मोठी व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर येते. निवडणुकीसाठी नावे जाहीर होतात आणि चौवीस तासात ती नांवे कट करतात, विद्यमान खासदार भावना गवळी यांना डावलतात आणि काहीतरी फेरबदल करतात. निवडणूक काळात महाराष्ट्रातील वर्षा बंगला हा सत्तेचं केंद्रस्थान झाले आहे. या शासकीय बंगल्यावर खरे तर राजकारण सुरू झाले आहे. पक्षाच्या बैठका पक्ष कार्यालयात घ्या ना, वर्षा बंगल्यावर शक्ती प्रदर्शन केलं जातंय याचा उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे.

    दलबदलबाबत तपासे म्हणाले, कोणी कोठे जावे याच स्वातंत्र्य आहे. पण जनता आमच्या बरोबर हे आम्हाला माहित आहे. आम्ही सर्वसामान्य गृहिणी, भगिनी वैशाली दरेकर-राणे या अनुभवी उमेदवार  म्हणून दिलेला आहे आम्हाला खात्री पक्षातील नेते जरी गेले तरी जनता आमच्या बरोबर आहे. जे गेले त्यांचा आम्हाला काही फरक पडत नाही. दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार पक्षामध्ये किल्लेदार, वजनदार, वतनदार असे सगळेच गेले राहिले कोण तर मावळे. ही लगान टीम घेऊन आम्ही बॅटिग करणार आहोत.

    यावेळी वंडार पाटील म्हणाले, कल्याण लोकसभा मतदार संघांसाठी शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांच नाव कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून जाहीर केल्या त्याचा आनंद झाला. त्यांना शुभेच्छा देण्याससाठी आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आलो आहोत. त्यांना निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

Previous Post Next Post