खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विश्वास
डोंबिवली ( शंकर जाधव ) : २०१४ साली अडीच लाखांच्या फरकाने मला लोकांनी मला निवडून दिले होते.२०१९ ला साडे तीन लाखांच्या फरकाने कल्याण लोकसभेची निवडणूक जिंकली होती. आता २०२४ ला ही मोठया मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवार १ तारखेला डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेत माजी नगरसेवक व गटप्रमुखाची भेट घेतली.यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकारी व शिवसैनिककांशी बोलताना अति आत्मविश्वास बाळगू नका आणि सतर्कतेने कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
त्यांनतर पत्रकारांशी बोलताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले, विरोधकांना आज ना उद्या कोणताना ना कोणता उमेदवार द्यावा लागेल. मात्र याचा विचार न करता आम्ही केलेली कामे लोकांपर्यत कश्या प्रकारे जातील त्यासाठी या बैठका सूरु आहेत. उमेदवार कोणीही असला तरी निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने लढणार आहे. कुठेही ओव्हर कॉन्फडन्स आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये येता कामा नये. २०१४ साली अडीच लाखाच्या फरकाने मला लोकांनी मला निवडून दिले होते. २०१९ ला साडे तीन लाखांच्या फरकाने कल्याण लोकसभेची निवडणूक जिकली होती. २०२४ ला ही मोठ्या मताधिक्याने मी कसा निवडून येईन याकरता कार्यकर्ते काम करत आहेत.
या बैठकीत कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, उपजिल्हाप्रमुख रवी पाटील, युवासेना सचिव दिपेश म्हात्रे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे,महिला आघाडी प्रमुख लता पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे,जनार्दन म्हात्रे, नितीन पाटील, रणजीत जोशी,माजी नगरसेविका कविता म्हात्रे, संतोष चव्हाण, गजाजन व्यापारी, सोपान पाटील, सागर जेधे, सागर दुबे, राहुल म्हात्रे यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.