कल्याणमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता ही उत्सुकता संपली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांचे नाव जाहीर केले आहे. २००९ साली मनसेकडून वैशाली दरेकर यांना १ लाख ९ हजार मते मिळाली होती.त्यांच्यासमोर शिवसेनेकडून आनंद परांजपे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून वसंत डावखरे उभे होते.

Post a Comment

Previous Post Next Post