महात्मा फुले चौक पोलिसांची कामगिरी
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण, जळगाव व तेलंगणा राज्यात चंदानगर, यलाल, तांडुर टाऊन व पंजगुट्टा पोलीस ठाणे हद्दीत एकूण १२ घरफोडी गुन्हे दाखल झालेल्या दोघा चोरट्यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली. गुन्हे उघडकीस आलेले असुन त्याच्याकडून सदर १२ गुन्हयातील एकूण ३.६२,२६० रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश धनाजी शिंदे ( २५, बी कॅबीन रोड साईनंद मॅरेज हॉलजवळ, दत्तकुटीर चाळ, अंबरनाथ पुर्व ) व रेकार्डवरील सॅमसंग रूबीन डॅनियल ( २५ ) क्वालीटी कंपनीजवळ, बेतुरकरपाडा, कल्याण ( प ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहते.२८ मार्च रोजी अविनाश याला अंबरनाथ येथे पडकले. २७ तारखेला रात्री दीड वाजता म फिर्यादी हेमंत रामदास सांगळे यांच्या कल्याण पश्चिम येथील बैलबाजार मधील सांगळेवाडीतील शंकर सांगळे चाळीतील राहत्या घरचा दरवाजाचा कोयंडा तोडुन प्रवेश करून हॉलमधील लाकडी कपाटात ठेवलेले ४९,२६० रुपये किमतीचे ७ ग्रॅम, ३२० मिली वजनाचे कानातील दोन सोन्याचे झुमके, ९००० रोख रक्कम असे एकुण ५८,२६० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरला. महात्मा फुले चूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर वपोनि शैलेश साळवी यांनी चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार केले होते. पोलिसांनी अविनाश आणि सॅमसंग यांना अटक केली. कल्याण, जळगाव व तेलंगणा राज्यात चंदानगर, यलाल पोलिस ठाणे, तांडुर टाऊन पोलीस ठाणे, व पंजगुट्टा पोलिस ठाणे हद्दीत अशा एकुण १२ घरफोडी केली होती. सॅमसंग यांच्याविरूध्द ९ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
दोघे चोरटे आंतरराज्य घरफोडी चोरीचे गुन्हे करणारी टोळी असून त्यांनी महाराष्ट्र, तेलंगणा राज्यात घरफोडी चोच्या केल्या असून इतर राज्यातही घरफोडी केल्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली.गुन्हयाचा तपास पोहवा सुचित टिकेकर हे करीत आहेत. अटक आरोपीकडून खालील गुन्हे उघडकीस आलेले असुन त्याचेकडून सदर १२ गुन्हयातील एकूण ३.६२,२६० रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले आहे. सदर कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ,सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि शैलेश साळवी, पोउपनि किरण भिसे, सपोउपनि विजय भालेराव, पोहवा कदम, पोहवा साळुंखे, पोहवा तडवी, पोहवाटिकेकर, पोना मधाळे, पोशि वडगावे, पोशि कोळी यांनी केली आहे.