डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलट स्फ़ोट

 


डोंबिवलीजवळील सोनारपाडा येथील घटना 

डोंबिवली (शंकर जाधव ) :  डोंबिवलीजवळील एमआयडीसीजवळील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलट स्फ़ोट झाल्याने शहर हादरले. या घटनेत १५ कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त हाती आले. जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुरुवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे आजूबाजूकडील कंपनीत कर्मचारी बाहेर आले होते.घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते.मात्र आग इतकी मोठी होती कि आगीच्या ज्वाळा दुरपर्यत दिसत होत्या. 



आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सदर, कंपनी केमिकलची असल्याने भीती व्यक्त केली जात आहे. तूर्तास आग विझवणे शक्य होत नाही. आग वाढतच आहे. आजूबाजूच्या कंपनीमध्ये आग पसरत चालल्याची माहिती आहे. अधिकच्या अग्निशमनच्या गाड्या परिसरातून मागवल्या जात आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post