कल्याणमध्ये फेर निवडणूक न झाल्यास आमरण उपोषण करणार

  


 अभिजीत बिचुकले यांचा इशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान यादीतून ८० हजार मतदारांची नावे गायब झाल्याचा आरोप होत आहे. 

कल्याण लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजित बिचुकले म्हणाले, कल्याण मतदारसंघातील सुमारे ८० हजार मतदारांची नावे गायब झाल्याचे समोर आले होते. मतदानापासून ८० हजार मतदार वंचित आहेत. त्यामुळे मतदान आयोगाने पुन्हा कल्याण मतदारसंघात मतदान घ्यायला हवे. असे झाले नाही तर मी २७ मे पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा बिचुकले यांनी दिला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post