पालघर स्थानकात मालगाडीचे डबे घसरले



पालघर :  पश्चिम रेल्वेच्या अप मार्गावर मुंबई आणि सुरत सेक्शनमधील पालघर रेल्वे स्थानकात एका मालगाडीचे ५-६ डबे घसरल्याची मंगळवारी सायंकाळी घडली आहे. या मालगाडीत मोठ्या प्रमाणावर लोखंडाची वाहतूक केली जात होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे मुंबई ते सुरत अप मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली. या घटनास्थळावरील रुळांवरून घसरलेले मालगाडीचे डबे उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.



सध्या मुंबई, विरारहून डहाणू, गुजरातच्या दिशेला जाणारी रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू आहे. मात्र गुजरातवरून मुंबई, विरारकडे येणारी सेवा ठप्प झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रेल्वे प्रशासन, पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ सर्व यंत्रणा घटनास्थळावर दाखल झाली आहे. यंत्रसामुग्री आणून घसरलेले डब्बे बाजूला करून रेल्वे सेवा लवकरच सुरळीत करण्यात येईल असे म्हटले जात आहे.

त्या बरोबरीने या मालगाडीच्या डब्यावर असणाऱ्या अवजड कॉईल लगतच्या लूप लाईन (स्लाइडिंग ट्रॅक) वर पसरल्याने पालघर रेल्वे स्थानकात असणारे रेल्वे लाईन क्रमांक दोन, तीन व चार वरील सेवा खंडित झाली आहे. त्याच बरोबरीने अप दिशेच्या विद्युत वाहिनी नादुरुस्त झाली असून पुढील किमान चार ते पाच तास या मार्गावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे.



पालघर यार्ड येथे मालगाडीच्या वॅगन्स रुळावरून घसरल्याने मुंबई-सुरतच्या यूपी मार्गावर परिणाम झाला आहे. 
 जीर्णोद्धाराचे काम सुरू असून याप्रकरणी पश्चिम रेल्वेकडून 
  हेल्पलाइन क्रमांक प्रदान करण्यात आले आहे


 वापी स्टेशन
 ०२६०-२४६२३४१

 सुरत स्टेशन
 ०२६१-२४०१७९७

 उधना
 ०२२-६७६४१८०१

Post a Comment

Previous Post Next Post