महाड (प्रतिनिधी): राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतच्या काही श्लोकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाडच्या चवदार तळ्यावर मनुस्मृतीचे दहन केले. तसेच आगामी अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचाही उपयोग करण्यात येणार आहे.
बुधवारी रायगडच्या महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन त्यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यापूर्वी चवदार तळे येथे उतरून ओंजळीने पाणी प्याले. रायगडच्या महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. यावेळी त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेसाठी चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. त्यामुळे मनुस्मृतीच्या अभ्यासक्रमातील समावेशाला विरोध करण्यासाठी आव्हाड यांनी ही जागा निवडली.
दरम्यान आव्हाड यांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांची छायाचित्रे असलेले पत्रके फाडल्याबद्दल त्यांच्याविरोधात विरोधकांनी टीका केली आहे.