डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन
डोंबिवली महायुतीच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन
डोंबिवली ( शंकर जाधव ) : ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची, देशाचे भवितव्य आणि दिशा ठरवणारी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षात देशाने मोठी प्रगती केली असून प्रत्येक क्षेत्रात देश पुढे गेला आहे असे डॉ. श्रीकांत शिंदे डोंबिवलीत म्हणाले. कल्याण लोकसभेतील डोंबिवलीत महायुतीच्या निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले तेव्हा खासदार शिंदे बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष, माजी खासदार आनंद परांजपे, भाजपचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, रमाकांत देवळेकर, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, विधानसभा प्रमुख संतोष चव्हाण, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, मनसे शहराध्यक्ष राहुल कामत, मनोज घरत, भाजपचे नंदू परब, शिवसेना महिला आघाडीच्या उपनेत्या विजया पोटे, महिला जिल्हा संघटक लता पाटील, महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे रिपाइंचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे यांच्यासह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना नव्हे, तर देशासाठी एकत्र आलेल्यांना निवडून द्या, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना महायुतीला निवडून दया.
ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची, देशाचे भवितव्य आणि दिशा ठरवणारी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षात देशाने मोठी प्रगती केली असून प्रत्येक क्षेत्रात देश पुढे गेला आहे. भारताची अर्थव्यवस्था पहिल्या पाचात आली असून लवकरच ती पहिल्या ३ मध्ये येईल असा विश्वास व्यक्त करत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच समस्त देशवासीयांची ५०० वर्षांची प्रतीक्षा संपून भव्य राममंदिर उभे राहिले. केंद्र आणि राज्य सरकारच्या भक्कम पाठबळाने कल्याण लोकसभेतही मागील १० वर्षात विक्रमी विकासकामे झाली असून कल्याण शिळ रस्त्याचे सहा पदरीकरण आणि काँक्रीटीकरण, शिळफाटा येथे उड्डाणपूल, मुंब्रा वाय जंक्शन येथे उड्डाणपूल, डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, पत्री पूल, काटई ऐरोली फ्री वे, काटई रांजणोली एलिवेटेड मार्ग, कॅशलेस हॉस्पिटल, लहान मुलांसाठी एनआयसीयू, मेट्रो या काही प्रमुख कामांसह इतर अनेक प्रकल्प कल्याण लोकसभेत पूर्ण झाले असून काही प्रकल्प हे प्रगतीपथावर आहेत, तसेच लवकरच कल्याण डोंबिवलीत मेट्रोही येणार आहे.
शिवसेना आणि भाजपासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांचीही शक्ती एकत्र आली असून महायुतीचे बळ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येत्या २० मे रोजी सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून महायुतीच्या मोठ्या विजयाचे शिल्पकार आणि साक्षीदार व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
