नवी दिल्ली : भारतातील हवाई प्रवाशांचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला विस्ताराहून मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द करण्यात आली होती. एअरलाइनचे ३०० वरिष्ठ क्रू मेंबर 'सिक लीव्ह'वर गेल्याने एअर इंडिया एक्सप्रेसने मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळपर्यंत ८६ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसची ८६ आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
मंगळवार संध्याकाळपासून अनेक केबिन क्रू मेंबर्स आजारी असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, एअरलाइनकडे पुरेसे केबिन क्रू मेंबर्स नाहीत, म्हणून कोची, कालिकत आणि बेंगळुरूसह विविध विमानतळांवरील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
अचानक घडलेल्या घटनेचे कारण समजून घेण्यासाठी नागरी विमान वाहतूक अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेसची उड्डाणे कर्मचारी सदस्यांच्या कमतरतेमुळे रद्द करण्यात आली कारण टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाइनमधील अनेक कर्मचारी आजारी पडल्याने ही समस्या उद्भवली असल्याचे म्हटले जात आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेसने याबाबत एक निवेदन जारी करून सांगितले की, आमच्या केबिन क्रूच्या एका विभागातील कर्मचाऱ्यांची मंगळवारी रात्रीपासून तब्येत बिघडल्याने निदर्शनास आले. त्यामुळेच फ्लाइट विलंब आणि रद्द करण्याची वेळ आली. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीबाबतची कारणे समजून घेण्यासाठी आम्ही क्रूशी संपर्क साधत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर
प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने माफी मागत बाधित झालेल्यांना पूर्ण परतावा किंवा पुनर्नियोजनाची सवलत दिली जाईल असे देखील स्पष्ट केले.
.jpeg)
.jpeg)