बांगलादेशच्या खासदाराची भारतात हत्या

 


कोलकाताच्या एका फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

नवी दिल्ली :  भारतात उपचारासाठी आलेले बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम यांची कोलकाता येथे हत्या करण्यात आली. ते ११ मे रोजी उपचारासाठी पश्चिम बंगालमध्ये पोहोचल्याचे वृत्त आहे.  यानंतर ते  अचानक बेपत्ता झाला. त्यांचे शेवटचे लोकेशन हे कोलकात्याच्या राजारहाट येथील संजीव गार्डन येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.  याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी हरवल्याची नोंद करून तपास सुरू केला.  मात्र, बुधवारी बांगलादेशचे गृहमंत्री असदुजमान खान यांनी अझीमची हत्या झाल्याचे जाहीर केले.  याप्रकरणी बांगलादेश पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे. 

भारतात बेपत्ता झालेले अवामी लीगचे खासदार अन्वारुल अझीम यांची कोलकाता येथील फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे मारेकरी बांगलादेशी असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. कट रचून अन्वारुल अझीम यांची हत्या करण्यात आली असल्याचे खान यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर बांगलादेश पोलिसांनी ५६ वर्षीय खासदाराच्या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे मृतदेहाबाबत विचारणा केली असता, मंत्र्याने सांगितले की, त्यांना अद्याप याबाबत माहिती मिळालेली नाही. या प्रकरणी हत्येमागील कारणे लवकरच उघड करणार असल्याचे असदुजमान यांनी सांगितले. भारतीय पोलिसही या प्रकरणी माहिती गोळा करत असल्याचे देखील खान यांनी सांगितले. 



Post a Comment

Previous Post Next Post