खंडाळ्यातील भीषण अपघातात दोन ठार

 


  तीव्र वळणावर कंटेनर कारवर पलटी

   सहा जण जखमी 

खंडाळा :  मुबंई - पुणे जुन्या महामार्गांवर खंडाळा राजमाची पॉईंड येथील बॅटरी हिल गावाजवळील तीव्र उतारावर वळणावर कंटेनर कार वर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला, या अपघातात कारमधील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत, 

जुन्या महामार्गवरून लोणावळा हुन मुंबईकडे हा कंटेनर क्रमांक ( एम एच १४ एफ टी १४४५) हा जातं असताना तो बॅटरी हिल जवळील  तीव्र वळणावर आला असता लोणावळाकडे जाणाऱ्या कार क्रमांक (एम एच १४ बी एक्स १६०५) वर पलटी झाला. ही कार अलिबागवरून तळेगाव येथे जातं होती. 


या कारमध्ये तळेगाव येथील चौधरी कुटूंबातील आठ जण प्रवास करत होते, यामध्ये कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर योगेश चौधरी( वय ४० )जान्हवी योगेश चौधरी (वय ३१) दीपाशा योगेश चौधरी (वय ९ )जिगीक्षा योगेश चौधरी (वय १.५ ) मितांश दत्तात्रय चौधरी, (वय ९ )भूमिका दत्तात्रय चौधरी (वय १६ )हे सहा जण किरकोळ जखमी झाले असून सर्व जखमीना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post