लोणावळा, ( श्रावणी कामत ) : लोणावळा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मोठ्या उत्साहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ज्येष्ठ नेते रमेश चंद्र नय्यर यांच्या निवासस्थानी ध्वज फडकवून मान वंदना देण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषात घोषणा देत २५ किलो लाडू वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शरदचंद्र पवार गट शहराध्यक्ष नासिर शेख, महिला अध्यक्षा श्वेता वर्तक, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद होगळे ज्येष्ठ प्रांतिक सदस्य यशवंत पायगुडे,जिल्हा प्रमुख मच्छिन्द्र खराडे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब फाटक, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर, राष्ट्रवादी पुणे जिल्हा सदस्य राजू बोराटी, नेहा पवार, गायत्री रिले, उषा राऊत, अजिंक्य कुटे, अजय गोदीया, आदिल शेख, फिरोज शेख, संतोष कचरे, किरण पाळेकर अमोल गायकवाड, संतोष कांबळे यांसह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच नासिर शेख यांनी ध्वजारोहण व या कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी, फ्रंटल व सेलचे प्रमुख व कार्यकर्ते माजी नगरसेवक हे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.