राज्यभरातील १६.३ लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (MSBSHSE) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्यभरातून यंदा तब्बल १६ लाख ३२ हजार ९०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये ८ लाख २१ हजार ४५० मुली व ८ लाख ११ हजार ४५६ मुले सामील होती.
निकालाचे संकेतस्थळ
https://mahresult.nic.in
https://sscresult.mkcl.org
https://mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org
एकूण परीक्षार्थी १६,३२,९०६
मुले ८,११,४५६
मुली ८,२१,४५०
परीक्षा केंद्रे ५,०३३
विषयांची एकूण संख्या ८७
प्रश्नपत्रिकांची संख्या १२ लाखांहून अधिक
निकाल कसा पाहाल?
१. वरील संकेतस्थळांपैकी कोणतेही एक उघडा.
२. "SSC Examination March 2025 Result" या लिंकवर क्लिक करा.
३. आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव/जन्मतारीख भरा.
४. सबमिट केल्यावर निकाल स्क्रीनवर दिसेल.
५. निकालाची प्रिंट/पीडीएफ सेव्ह करून ठेवा.
मूळ गुणपत्रक व पुढील प्रक्रिया
ऑनलाईन निकाल तात्पुरता असेल.
विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रक त्यांच्या शाळांमधून पुढील काही आठवड्यांत मिळेल.
पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी निकालानंतर सुरू होईल.
अपात्र विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाणार आहे
अकरावी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू
दहावीचा निकाल जाहीर होताच, अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया (FYJC Admission) सुरू होणार आहे. यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ आणि वेळापत्रक जाहीर केले जाईल.
२०२४ मध्ये एकूण निकालाचा टक्का ९३.८३% होता. मुलींचा निकालाचा टक्का मुलांपेक्षा अधिक होता. यंदाही उत्तीर्णतेचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.