अलिबाग, (धनंजय कवठेकर) : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल चिटणीस चंद्रसेन पवार, नायब तहसीलदार मनोज गोतारणे, अलिबाग तहसीलचे वाहन चालक मयूर महाडिक, वेगवेगळ्या विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागामार्फत कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी अनेकांनी महाराजांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' असा जयघोष यावेळी करण्यात आला. दरम्यान, महाराजांच्या कार्याची माहितीदेखील उपस्थितांना देण्यात आली.