स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा



ठाणे, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाने भाजपचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे ( Niranjan davkhare) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या २०१८ च्या निवडणुकीप्रमाणेच स्वाभिमान शिक्षक संघाने या निवडणुकीतही निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला.

(BJP) भाजपचे मुरबाड येथील आमदार व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किसन कथोरे (Kisan kthore) यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार निरंजन डावखरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच कोकणातील प्रत्येक शिक्षक मतदारापर्यंत पोचून भाजपाला मतदानाचे आवाहन करणार असल्याची ग्वाही दिली. या वेळी संघटनेचे राज्याध्यक्ष यादव पवार, राज्य संपर्क प्रमुख राणू बनसोडे, ठाणे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटोळे, जिल्हा कोषाध्यक्ष विनायक जाधव, तालुका अध्यक्ष नारायण गोल्हे, भरत पांढरे, वसंत घावट, दिपक धूमाळ, रवींद्र घोडविंदे आदी उपस्थित होते.

कोकणात डिजिटल शाळा, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, शिक्षकांचे प्रश्न, पेन्शन योजना मंजुरी आदींबाबत आमदार डावखरे यांच्याकडून केला जाणारा पाठपुरावा स्तुत्य आहे, अशा शब्दांत आमदार किसन कथोरे यांनी कौतुक केले. तसेच आमदार डावखरे यांना बहुमताने विजय मिळेल, असा विश्वास कथोरे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post