Navi mumbai corporation: नवी मुंबईतील १२०३ अनधिकृत झोपडयांवर धडक कारवाई

 


नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतर्फे मान्सूनपूर्व कामांना गती देण्यात आली आहे. पालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील १२०३ अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आली. पावसाळा कालावधीत नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास दुर्घटना घडू नये म्हणून डोंगर पायथ्याशी असलेल्या दरड प्रवण क्षेत्रातील झोपडपट्टया हटविण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.


यामध्ये बेलापूर विभागात दुर्गानगर, पंचशिल नगर, बेलापूर उड्डाणपूलाखाली, से.२८ येथील विठ्ठल मंदिराच्या बाजूला अशा एकूण २५१ अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आली. तसेच नेरूळ विभागात से.९ पाण्याच्या टाकीच्या बाजूला, महात्मा गांधीनगर बालाजी मंदिराच्या बाजूला असलेल्या ९० अनधिकृत  झोपडया हटविण्यात आलेल्या आहेत. वाशी विभागामध्ये हायटेन्शन वायरच्याखाली, मुंबई – पुणे मार्गालगत वाशी गाव टोलनाक्याच्या बाजूला अशा दोन ठिकाणच्या ८१८ अनधिकृत झोपडयांवर कारवाई करण्यात आलेली आहे. घणसोली विभागात पामबीच मार्गालगत साईबाबा मंदिराजवळील २७ अनधिकृत झोपडया तसेच ऐरोली विभागात ठाणे बेलापूर रस्त्यानजिक भारत बिजली कंपनी समोरील रेल्वे रुळांनजीक अनधिकृतरित्या वसलेल्या १५ झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. दिघा विभागातही ईश्वरनगर आणि विष्णुनगर येथील २ अनधिकृत झोपडया निष्कासित करण्यात आल्या आहेत.


महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली आठही विभागांच्या सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी अतिक्रमित झोपडपट्टी हटाव मोहीम प्रभावीपणे राबविली. 



Post a Comment

Previous Post Next Post