मुंबई: दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरात एका ५७ मजली इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. घटनेची माहिती तातडीनं अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आली असून त्यांनी तातडीनं धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सदर घटना ११:४२ वाजता भायखळ्यातील खटाव मिल कंपाउंड मध्ये घडली. या इमारतीच्या मॉन्टे साऊथ बिल्डिंगच्या ए विंगच्या १० व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली. या आगीमुळे इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये घबराहट पसरली.
इमारतीत धुराचे लोट पसरले. आगीवर अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. सुदैवाने आग इतर फ्लॅट पर्यंत पसरली नाही. आणि कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाचे नऊ बंब घटनास्थळी उपस्थित होते. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्राथमिक तपासणीत आगीचे कारण शॉर्टसर्किट असू शकते.
