अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरामाराला आपल्या कुशाग्र युद्धनैपुण्याने नमवीत, मराठा आरमाराचा भगवा ध्वज सागरातदिमाखात फडकवीत ठेवणारे मराठा आरमार प्रमुख दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यस्मरणदिनी अलिबागस्थित त्यांच्या समाधीस्थळी भेट देऊन दर्यासारंगाना श्रद्धासुमन अर्पण केले.
यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश पालकर, अलिबाग युवा मोर्चा अध्यक्ष ॲड. निखील चव्हाण, झिराड ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच महेश माने, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर, भाजप कार्यकर्ते दिनेश पाटील, अमित पाटील, प्रशांत पाटील, अलिबाग मंडल कार्यकारिणी उपाध्यक्ष मंगल ठाकूर आणि अन्य सहकारी उपस्थित होते.


