मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांचे ट्वीट
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली व आजूबाजूकडील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण झाले असले तरी आता पुन्हा रस्त्यामध्ये खोदकाम सुरु झाल्याने मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी ट्वीट करत याचा जाब विचारला आहे.
मंजूर असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कॉंक्रीटी रस्त्याच्या निधीचा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे चुराडा होत असल्याने रस्त्यांची कामे निकृष्ट दर्ज्याचा ठपका ठेवत पुन्हा खोदकाम करणाऱ्या कारवाई होणार का ? असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील डोंबिवली जिमखाना रस्त्यावर रस्त्याचे खोदकाम सुरु आहे. रस्त्याचे काम सुरु असताना नागरिकांना प्रश्न पडला आहे कि रस्त्याचे काम तर आतच केले मग पुन्हा काम करण्याची वेळ का आली.