'सैन्य दलातील नोकरीच्या संधी' विषयावर व्याख्यान





 स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक शाळेचा उपक्रम 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  निवृत्त मेजर विनय देगावकर यांचे 'सैन्य दलातील विविध पदे व भरती प्रक्रिया' या विषयावर गुरुवारी १८ तारखेला राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक शाळेच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहामध्ये व्याख्यान आयोजित केले होते.

इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स करण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.  भारतीय सैन्य दलाचे विविध विभागाचे कामकाज कसे चालते, यासाठी आपण कशा पद्धतीने शारीरिक व मानसिकरित्या तयार व्हावे याचे मार्गदर्शन श्री देगावकर यांनी करतानाच लष्करामध्ये सैनिक व अधिकारी या दोन्ही पदासाठीची निवड कशी होते त्यासाठी किती शिक्षण लागते याची माहिती निवृत्त मेजर देगावकर यांनी यावेळी सांगितले.



 

अगदी ब्रिटिश काळात सुरू झालेलं भारतीय लष्कर ते आत्ताचे सैन्य दल इथपर्यंतचा प्रवास,  भारताचे सर्वात जास्त सैनिक हे उत्तर भागातील सीमेवर आहे. भारताने पाकिस्तान, चीन यांच्याबरोबर झालेल्या युद्धात कशाप्रकारे जिंकलो याची सावित्तर माहिती दिली. सैन्य दलातून परमवीर चक्र , अशोक चक्र अशी मानाची शौर्यपदके मिळवलेल्या सैनिकांची माहिती त्यांनी दिली.त्याचबरोबर सैन्य दलात अभियंता म्हणून कार्य करताना आलेल्या  आठवणी देखील त्यांनी सांगितल्या.तर अजूनही पालक आपल्या मुलांना सैनिक म्हणून पाठवण्यास धजावत नाहीत ही खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन त्यांनी केले. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा बोंडे , ज्येष्ठ शिक्षक  लजपत जाधव हे उपस्थित होते. सूत्रसंचालन छाया भालेराव यांनी केले. कार्यक्रमाची व्यवस्था मधुरा सावंत व संदीप भावे यांनी पहिली.





Post a Comment

Previous Post Next Post