अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : भारतीय जनता पक्षाच्या विकासवादी धोरणांवर विश्वास ठेवून दक्षिण रायगड जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुक्यातील ताडवागळे येथील कार्यकर्ते आणि नागरिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
यामध्ये प्रामुख्याने माजी सदस्य प्रतिक प्रकाश अरीलकर (शाखा प्रमुख शिंदे गट ), माजी सरपंच यशवंत लोभी (शेकाप ), माजी सदस्य सिद्धेश हंबीर (शिवसेना शिंदे गट )माजी सदस्य अशोक नाईक (शेकाप ),ज्येष्ठ कार्यकर्ते चव्हाण, शेकाप कार्यकर्ते सुरेंद्र शिंदे, महादेव मेंगाळ, मिलिंद हंबीर, सदानंद पाटील, नारायण पाटील, विलास अरीलकर, नारायण सावंत, वामन हंबीर, सुनिल मेहेतर, विमल नाईक, सुरेखा नाईक अस्मिता नाईक, मंगल नाईक, अनिता नाईक, भागीताई नाईक यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ सदस्य व कार्यकर्ते दिवाकर पाटील,महेंद्र पाटील, राजेश पाटील, अमित पाटील, अनिस ढाले, मुजीब अवसेकर आणि १५०-२५० मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.