Budget 2024 : २०२४ च्या अर्थसंकल्पावर चर्चासत्र

 



डोंबिवलीत जेएमएफ शिक्षण संस्थेचा उपक्रम 

         डोंबिवली ( शंकर जाधव ) :   अर्थमंत्री  निर्मला सीतारामन  यांनी २३ जुलै रोजी सातवा अर्थसंकल्प ' सादर केला.अर्थसंकल्पावर जे एम एफ संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी   मधुबन  दालनात चर्चा आयोजित केले होते.शाळा व महाविद्यालयाचे शिक्षक यांच्या उपस्थितीवर अर्थसंकल्पावर चर्चा झाली. 

        ठराविक कालावधीत तुम्ही किती पैसे कमवावे किंवा वाचवावे याची गणना करण्याची प्रक्रिया आणि तुम्ही ते कसे खर्च कराल ह्याचे नियोजन करणे म्हणजेच आपल्या वर्षभराचे खर्चाचे अंदाजपत्रक म्हणजेच ' बजेट ' अर्थात ' अर्थसंकल्प 'असे सोप्या भाषेत संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले.






      डॉ. कोल्हे पुढे म्हणाले, दरवर्षी प्रत्येक गोष्टींमधे दराचा चढ उतार होत असतो. कधी कधी जीवनावश्यक वस्तूंचा दर वाढून त्या महागल्या जातात , तर चैनीच्या  वस्तूंचे दर कमी होऊन त्या स्वस्त होतात. याचाच अर्थ असा आहे की गरीब हा गरीबच राहतो, आणि श्रीमंत हा श्रीमंतच राहतो. म्हणून तळागाळातील सर्व लोकांना विचारात घेऊन, त्यांना समोर ठेऊन अर्थसंकल्प मांडावा.

    शालेय विद्यार्थ्यांनी देखील आई वडिलांनी दिलेले पैसे हे कसे नियोजन पूर्वक वापरावेत ह्याचेही ठोकताळे माहिती करून घेणे गरजेचे आहे. घरातील स्त्री म्हणजेच   गृहिणी हीच खरी अर्थसंकल्प रचणारी, हाताळणारी खरी महिला आहे असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगून अशिक्षित आई देखील महिन्याचे, वर्षभराचे घरातल्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करत असते व त्याप्रमाणे नियोजन करून घरखर्च ठरवत असते. राजकीय दृष्ट्या अर्थसंकल्प हा देशाभराचा फायद्या तोट्याचा असू शकतो ,परंतु घर चालवणारी स्त्री ही नेहमीच खर्चाचे अंदाजपत्रक आखून फायद्याचा च विचार करत असते असे डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपले मत मांडले.

       दोन तासाच्या चर्चासत्रात अनेक विद्यार्थ्यांनी शंका, प्रश्न विचारले, त्यांची समर्पक उत्तरे डॉ.राजकुमार कोल्हे यांनी मुलांना दिली.  कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी  एकनाथ चौधरी यांनी सांभाळली तर श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.





Post a Comment

Previous Post Next Post