अभुदय बँक दिवा शाखेचा १३ वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा

 



अभुदय बँकचा ६० वा स्थापना दिन संपन्न


दिवा, (आरती मुळीक परब) : अभुदय बँकचा ६० वा स्थापना दिन तर अभुदय बँकेच्या दिवा शाखेचा १३ वा वर्धापन दिन दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण बँकेत सजावट करण्यात आली होती.
अभ्युदय सहकारी बँक ही १९६४ साली स्थापन करण्यात आली. या बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यांपूरते मर्यादित आहे. ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे मागील १३ वर्षापासून बँक नागरिकांना सेवा पुरवीत आहे. याच बँकेचा १३ वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी डेप्युटी जनरल मॅनेजर गंगाधर नारकर, मॅनेजर पराग आरटे, रवींद्र धुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागरिकांच्या सेवेसाठी कायम प्रयत्नशील राहू अशी हमी अधिकारी, कर्मचारी वर्गाने घेतली. 



पराग आरटे, भालचंद्र भगत, राजू कांबळे, रवींद्र ठाकूर, श्रीराम मुंडे, बबन मुंडे, साईनाथ म्हात्रे, अभिजीत आलिमकर, सचिन पाटील, सचिन म्हात्रे हे मान्यवर कार्यक्रमच्या वेळी उपस्थित होते.
ग्राहकांचे सहकार्य आणि योगदान व चांगल्या प्रतिसादामुळे या शाखेने मोठी प्रगती केली आहे, अशी प्रतिक्रिया तेथे जमलेल्या मान्यवरांनी व्यक्त केली.



बँकेच्या विविध योजनेची माहिती यावेळी देण्यात आली.योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन रवींद्र धुरी यांनी केलं आहे. आमच्या ग्राहकांप्रती व आमची बांधिलकी अतुट आहे. आम्ही अनेक नवीन उपक्रम सादर करत आहोत. तर आमची मोबाईल बँकिंग आणि रुपये डेबिट कार्ड सेवा तरुण पिढीला आवडली आहे. आमच्या बँकेचे गोल्ड लोन, ई वाहन कर्ज, सोनार कर्ज, गृह कर्ज, उद्योग विकास कर्ज आकर्षक व्याजदराने ग्राहकांना आकर्षित करीत आहे. बँक सर्व  मॅच्युरिटी कालावधीच्या मुद्दत ठेवीवर आकर्षण व्याजदर देत आहेत. ज्या ८.१०% व्याज हे ज्येष्ठ नागरिकांना आणि ७.६०% व्याज सर्वसामान्यांसाठी ४५१ दिवसाच्या ठेवीवर देत आहेत. आम्ही आमच्या सर्व विद्यमान आणि संभाव्य ग्राहकांना, शेअर धारकांना, आमच्या हितचिंतकांना शाखेला भेट देण्यासाठी आमंत्रण करतो. आमचे कर्मचारी तुमच्या कोणताही प्रश्नांमध्ये मदत करण्यासाठी उपस्थित आहे. अभुदय को - ऑप बँक सर्वाना त्यांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल धन्यवाद देत आहे. 




Post a Comment

Previous Post Next Post