चोंढी येथे मोहरम निमित्ताने हिंदू - मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन

 



मोहरममध्ये किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांचा सहभाग


अलिबाग, (धनंजय कवठेकर) : देशात काही मागील दिवसांपासून जातीपातीत समाजकंटकांमुळे कमालीचे वितुष्ट व तणाव निर्माण होत आहे. दोन समाजामध्ये असलेला एकोपा नष्ट करण्यासाठी समाज विघातक कारस्थाने रचली जात आहेत, यामुळे देश विकासाकडे न जाता अराजकतेकडे जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र याला अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील हिंदू - मुस्लिम बांधवांनी वर्षानुवर्षे सर्व सण एकोप्याने साजरा करत फाटा दिला आहे. याबद्दल समाजाला व देशाला एक उत्तम संदेश दिला जात आहे.




          नुकताच बुधवारी दि.१७ जुलै रोजी मुस्लिम समाजातील असलेला मोहरम सण हिंदू- मुस्लिम बांधव एकत्र येऊन साजरा करत असल्याचे दिसून आले. मोहरममध्ये ताजियाच्या मिरवणुकीत किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व त्यांचे हिंदू मुस्लिम सहकारी, सर्व समाजातील भाविक व चोंढी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या सहभागी झाले होते.


          यावेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्यासह आसिफ मलिक, नदीम आत्तार, लियाकत शेख, शफीउल्ला सय्यद, मुस्तफा सय्यद, राजू कर्वेकर, दानिश मलिक, अल्लाउद्दीन कर्वेकर, मुफीद कर्वेकर, बाबू शेख, अश्रफ चोगले, सिराज माजगणकर, सुहान मुराद मसालेवाले, स्वप्नील गायकवाड, रोहन कातूर्डे व इतर हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मांडवा पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त ठेवला होता, यावेळी विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडली, संध्याकाळी उशिरा ताजियाचे विसर्जन करण्यात आले.







Post a Comment

Previous Post Next Post