डोंबिवली ( शंकर जाधव ) : आगामी. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघावर काँग्रेसला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी तथा माजी नगरसेवक नवीन सिंग यांना आगामी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी ३० तारखेला दादर येथील टिळक भवन येथे विभाग व सेल प्रदेश प्रमुख यांच्या पार पडलेल्या बैठकीत सर्व विभाग/सेल चे प्रदेश प्रमुखांनी ठराव करून सहीचे पत्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले.
या पत्रात कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून नवीन सिंग यांचे नाव पुढे करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन प्रमोद मोरे, विभाग व सेल मुख्य संयोजिका प्रज्ञा वाघमारे तसेच विभाग व सेलचे प्रदेश प्रमुख उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नागरी विकास सेलचे प्रदेश प्रमुख नवीन सिंग म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ९९ खासदार निवडून आले. त्यात महाराष्ट्रातील १३ खासदार आहेत.
याआधी महाराष्ट्रात काँग्रेस पार्टीचे एक खासदार होते. यावरून काँग्रेस पक्ष हा आणखीनच मजबूत झाला असून जनतेचा काँग्रेसवर विश्वास कायम आहे. कल्याण पूर्व विधानसभेत भाजपाचा आमदार असला तरी आतां चित्र बदलणार आहे. मला पूर्व खात्री आहे की येथील जनता काँग्रेसवर विश्वास ठेवील. महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळेल.