Badlapur school case : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीच्या घराची तोडफोड

  


अक्षयची आतापर्यंत तीन लग्न झालीत

 आई-वडील आणि भाऊही बेपत्ता


बदलापूर : बदलापूरमधील एका शाळेत शिशु वर्गातील दोन विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेच्या घराची गाववाल्यांनी तोडफोड केली. बदलापूर येथील खरवई गावात राहणाऱ्या अक्षय शिंदेची वयाच्या २४ व्या वर्षी तीन लग्न झाली असून तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या असल्याचे समोर आले आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर अक्षयचे  आई-वडील आणि भाऊ बदलापूर येथील घरातून बेपत्ता झाले आहेत.  बुधवारी गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली.


आरोपी अक्षय शिंदे हा मूळचा कर्नाटकातील गुलबर्गा येथील असून त्याचा जन्म बदलापूर येथे झाल्याची माहिती मिळाली आहे. तो बदलापूरच्या खरवई गावात आई-वडील आणि भावाच्या कुटुंबासह चाळीत राहतो. अक्षयचे नातेवाईकही जवळच राहतात. त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पूर्वी तो एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा. याआधी त्यांनी एका शाळेत सफाई कामगार म्हणूनही काम केले आहे. त्याला या शाळेत सफाई कामगाराची नोकरी आउटसोर्सिंगच्या कराराद्वारे मिळाली. 


वास्तविक, आरोपी अक्षय शिंदे याला १ ऑगस्ट २०२४ रोजी शाळेत शौचालय स्वच्छ करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आले होते. मुलींच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी शाळेने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याचा फायदा त्याने घेतला. याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर वर्गशिक्षिका आणि एक महिला कर्मचाऱ्याला बडतर्फ करून सफाई कामगार पुरविणाऱ्या एजन्सीचा करार रद्द करण्यात आला आहे. शाळेने सर्व पालकांची जाहीर माफीही मागितली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post