विद्यार्थिनीमध्ये 'खाकीतील सखी' उपक्रमाची जनजागृती

 



डोंबिवलीतील जोंधळे कॉलेजचा उपक्रम 

डोंबिवली ( शंकर जाधव):  पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांनी व्हीसी मिटिंग व खाकीतील सखी यांना प्रत्यक्ष दिलेल्या आदेशानुसार बुधवारी डोंबिवलीतील जोंधळे कॉलेज  येथे डोंबिवली लोहमार्ग पोलीस व  खाकीतील सखीतील ५ महिला पोलीस अंमलदार, १ गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार यांनी 'खाकीतील सखी' संकल्पनेची जनजागृती केली.




         जनजागृती मध्ये रेल्वे हेल्पलाइन १५१२ यावर कॉल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महिलांनी रेल्वेतून प्रवास  करत असताना बॅगेत आपल्या सुरक्षेसाठी साहित्य ठेवावे. महिलांना लोकल प्रवासात मदत मिळावी यासाठी मोबाईलवर 'महिला सखी व्हाट्सअप ग्रुप' स्थापन करण्यात आला असून त्याची कार्यपद्धती ची माहिती दिली.तसेच 'coto app' ची ही  माहिती दिली. मुंबई रेल्वे पोलीस महिला लोकल प्रवाशी यांच्या सुरक्षित प्रवासा करीता राबवित असलेले विविध उपक्रमा माहिती  देण्यात आल्याचे डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षका किरण उंदरे यांनी सांगितले. सदर जनजागृतीस कॉलेजमधील विद्यार्थी व व शिक्षिकवर्ग  उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post