HSC Result :राज्य मंडळाचा बारावीचा निकाल आज



मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) बारावीचा निकाल सोमवार, ५ मे २०२५ रोजी जाहीर होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केला जाणार आहे.

यंदाच्या परीक्षेला राज्यभरातून सुमारे १४.५ लाख विद्यार्थी बसले होते. विज्ञान, वाणिज्य, कला आणि व्यवसाय अभ्यासक्रम अशा सर्व शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य उज्वल करण्यासाठी परीक्षेला सामोरे गेले. परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ दरम्यान पार पडली होती.

निकाल कुठे पाहता येईल?
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल खालील वेबसाइट्सवर पाहता येणार आहे:

  • mahresult.nic.in
  • hscresult.mkcl.org
  • msbshse.co.in

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर आणि जन्मतारीख तयार ठेवावी. यावर्षी निकालाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार असून, शाळांमार्फत गुणपत्रकांचे वितरण नंतरच्या टप्प्यात होईल.

पुनर्परीक्षा व श्रेणी सुधार अर्ज

निकालानंतर नापास झालेल्या किंवा गुण सुधारायचे इच्छुक विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा व "Class Improvement Scheme" साठी अर्ज प्रक्रिया ६ मे २०२५ पासून सुरू होणार आहे. ही अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असेल आणि शुल्काचे पेमेंट नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड अथवा UPI द्वारे करता येईल.

महत्त्वाचे मुद्दे

पुढील परीक्षा जून-जुलै २०२५ मध्ये होणार आहेत.

विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊन अर्ज भरावेत.

www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सर्व माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.


Post a Comment

Previous Post Next Post