दिवा, (आरती मुळीक परब) : दिव्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांवर देखील ताण वाढत आहे. त्यासाठी दिव्यात स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी नागरिकांकडून होत आहे. ही बाब उबाठाच्या दिवा शहर संघटीका ज्योती पाटील यांनी जाणून उद्या एक सही आपल्या सुरक्षित भविष्यासाठी, एक सही दिव्यासाठी, एक सही स्वतंत्र दिवा पोलीस ठाण्यासाठी असा सहीचा उपक्रम नागरिकांसाठी आयोजित केला आहे.
वाढती गुन्हेगारी, वाढत्या चोऱ्या या सर्वांचा ताण दिव्यातील पोलीस चौकीवर येत आहे. ही पोलीस चौकी मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून दिव्यात दिलेली पोलीस तक्रारीची पोच पावती घेण्यासाठी नागरिकांना मुंब्र्याला जावे लागते. ते मेहनत नागरिकांची वाचावी, तो वेळ वाचावा यासाठी ही उबाठा तर्फे स्वतंत्र पोलीस स्टेशनसाठी भव्य सह्यांची मोहीम उद्या आयोजित करण्यात आली आहे. स्वतंत्र पोलीस स्टेशनसाठी दिवा रेल्वे स्टेशन जवळ येऊन जास्तीत जास्त सह्या नागरिकांना कराव्यात, असे उबाठाच्या दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांनी दिवेकरांना आवाहन केले आले आहे.