डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरात ३० किलो वजनाची चांदीची वीट अर्पण

Maharashtra WebNews
0

 



सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती 


डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील ग्रामदैवत असलेले श्री गणेश मंदिराला १०० वर्ष पूर्ण झाली आहे.ज्यावेळी एखाद्या देवस्थानाला १०० वर्ष पूर्ण होतात त्याविषयी त्या देवस्थानाला तीर्थक्षेत्राचे दर्जा प्राप्त होत असतो.डोंबिवली श्री गणेश मंदिरात जीर्णोद्धारावेळी गाभाऱ्यात चांदी बसवत असून इतर सुशोभीकरण करत आहे.पुढील पिढीसाठी या मंदिराची योजना करत आहे. तयार झालेल्या गाभाऱ्यात असून काम सुरु आहे. अजून कामाकरता १०० ते १५० किलो चांदी अपेक्षित आहे. त्यात बऱ्याच पैकी चांदी आली आहे. श्री गणेश मंदिर संस्थान हे अनेक लोकांपर्यत जात असून आवाहन करत आहे.





 सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते.नांदेड येथील दानशूर व्यक्ती सुमित मोगरे यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ३० किलो वजनाची चांदीची वीट अर्पण केली आहे. शनिवार १० तारखेला ही वीट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत श्री गणेश मंदिर संस्थानला देण्यात आली. या प्रसंगी मंदिर समितीचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. या जीर्णोद्धारामुळे मंदिराचे ऐतिहासिक महत्व जपले जाईल आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा आहे.वीट अर्पण करणाऱ्या सुमित मोगरे यांचे मंदिर समितीने आभार मानले असून या पवित्र कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मंदिराच्या अध्यक्षाअलका मुतालिका, राहुल दामले, प्रवीण दुधे आदी मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)