Dombiwali news : विशाख कृष्णस्वामी विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर




खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्य मार्गदर्शनाने शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे ह्यांचे  सहकार्य 



डोंबिवली ( शंकर जाधव ) : एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करुन घेणारा डोंबिवलीचा धावपट्टू ज्याच्या नावावर पायात कुठलेही बूट चप्पल न घालता (बेयर फिट) सलग २३ दिवस अर्ध मॅरेथॉनचे अंतर धावणार विशाख कृष्णस्वामी हा तरुण आपल्या  मेहनतीवर नवे विश्वविक्रमांना गवसणी घालण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या तो सलग २३५ दिवस २१.१ किलोमीटर हे अर्ध मॅरेथॉन अंतर धावण्याचा विश्वविक्रम मोडण्याच्या तयारीला लागला आहे. त्याने आता पर्यंत ह्या विक्रमाला मोडण्यासाठी सलग १५७ दिवस असे रोजच २१.१ किलोमीटर चे अंतर कापलेले असून विक्रम आपल्या नावावर करायला आता फक्त ७८ दिवसच बाकी आहे. परंतु विशाख हा फक्त सलग २३५ दिवस हाफ मॅरेथॉन अंतर धावून थांबणार नसून त्याने असा तब्बल सलग ७०० दिवस धावण्याचे ध्येय ठेवले आहे. २३५ दिवस सलग अर्ध मॅरेथॉन (पुरुष) धावण्याचा विक्रम चीनच्या लू इल्ह्याई ह्याच्या नावावर नोव्हेंबर २०२३ ला झालेला आहे.

   

    धावपटू विशाख हा सर्व सामान्य कुटुंबातून असून त्याच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले असून स्वतःच्या कर्तृत्वावर आणि मेहनतीवर तो येवढी मोठी झेप घेत आहे. पण बोलतात ना नुसत्या ध्येयाने पछाडून किंव्हा नुसत्या शारिरीक मेहनीने काही होणार नाही, शरीराला येवढ्या रोजच्या मेहनतीमुळे प्रचंड उर्जा खर्च करावी लागते आणि ती परत मिळविण्यासाठी तसे रोजच्या रोज सकस अन्न (न्यूट्रिट डायट) सुधा लागते, पायात तसे बूट, गिनीज विश्वविक्रम सहभागी होण्यासाठी त्यांची नोंदणी फी व त्याला अनुसरुन तशी साधनसुविधा बाळगावी लागते आणि ते घेण्यासाठी रोजचा पैसा गेले १५७ दिवस काही तुटपुंज्या मदतीवर त्याने कसेबसे प्रयत्न टिकवून ठेवले. पण ह्या पुढे ते करने अशक्य वाटत होते आणि कदाचित त्यामुळे हा रेकॉर्ड मध्येच थांबावा का असा प्रश्न निर्माण झाला. ही बाब एका दुसऱ्या धावपट्टूकडून शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांना कळली. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे ह्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांच्या आदेशाने त्याला ताबडतोब मदतीची तयारी केली. 



विशाखमुळे आपल्या डोंबिवली शहराचे आणि देशाचे नाव मोठे होणार असेल तर ते आमचे कर्तव्य ह्या भावनेतून शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे पुढे आले आणि  त्यांनी सहकार्य करण्याचे ठरविले. विशाख याला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनातून तब्बल १ लाखाची मदत  राजेश मोरे ह्यांनी शुक्रवार  १६ ऑगस्ट रोजी सकाळी डोंबिवलीच्या ह.भ.प संत सावळाराम क्रिडासंकुल येथे जिथे विशाख रोज हा विक्रम मोडण्यासाठी धावतो तिथे येवून सर्व क्रीडाप्रेमी डोंबिवलीकरांच्या साक्षीने सुपूर्द केली. विशाख कृष्णस्वामी हा आपल्या डोंबिवलीचा अभिमान असून चिन ला मागे टाकून तो आपल्या देशाचे नाव उज्वल करणार आहे. त्यामुळे त्याला प्रोत्साहन देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असून त्या भावनेतून ह्या पुढे जी काही मदत लागेल ती आम्ही शिवसेना पक्ष म्हणून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी विशाखला भावी वाटचालीला शुभेच्छा देताना दिले. 


विशाखच्या विश्वविक्रमाला गवसणी घालायाला ७८ दिवस बाकी असताना व आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वे वर्ष झाले हा योग जुळवून सहकार्य केले, ह्या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शिवसेना निरीक्षक तथा समन्वयक संतोष चव्हाण, दिनेश शिवलकर, शैलेश चव्हाण या पदाधिकाऱ्यासह डोंबिवली रनर्स क्लॅन चे सभासद लक्ष्मण गुंडप, मुकुंद कुलते व इतर धावपट्टू सभासद, न्यु फोर्स अकॅडमी चे शेख सर व सर्व विद्यार्थी, धावपटू डॉ शोभा पाटील, अनुज, अथर्व पाथाडे हे क्रिडाप्रेमी उपस्थित होते, सर्व क्रिडापट्टूंकडून शिवसेनेच्या खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व शहरप्रमुख राजेश मोरे ह्यांचे धन्यवाद मानले.




Post a Comment

Previous Post Next Post