डोंबिवली रेल्वे पोलिसांची कामगिरी
डोंबिवली ( शंकर जाधव ) : ठाकुर्ली रेल्वे स्टेशन येथे गस्त घालत असताना साडे सात वाजण्याच्या सुमारास कल्याण धीम्या गतीच्या रेल्वे गाडीत महिलांच्या डब्ब्यामागील मागील डब्ब्यात एक काळ्या रंगाची बेवारस बँग सापडली. गुरुवार १५ तारखेला घडलेल्या या घटनेची डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या बॅगेची तपासणी केली असता बॅगेत १,६२,१०० रोख रक्कम सापडली. पोलिसांनी बॅगेच्या मालकाची माहिती काढून सदर बॅग व रक्कम मालकाला परत केली. पोलीसांच्या कामगिरीबाबत मालकाने कौतुक केले. डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनचे पो हवा चौधरी, मपोहवा बांबले, पोशि बोईनवाड, मपोशि जाधव हे ठाकुर्ली रेल्वे स्टेशन येथे गस्त घालत होते.
बॅग सापडल्यावर पोलीसांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग करून सदर सॅक बॅकची अधिक तपासणी केली असता नमूद सॅक बॅग ही जयराम संजीव शेट्टी (४२), राह-डोंबिवली(प) यांचीच असल्याची माहिती मिळाली.पोलीसांनी बॅगेच्या मालकाला पोलीस ठाण्यात बोलावून बँग परत दिल्याची माहिती डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिली.