अलिबाग (धनंजय कवठेकर) : स्थानिक नेतृत्वाकडून भ्रमनिरास झाल्यामुळेग्रुप ग्रामपंचायत बोरघरमध्ये शिवसेना (शिंदे गट) यांना धक्का देत गंगेची वाडी ग्रामस्थांनी दक्षिण रायगड जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष दिलीप भोईर ऊर्फ छोटम शेठ यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. ह्यामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण पिंगळा, गजानन पारधी, कृष्णा पिंगळा, लक्ष्मण निर्गुढा, गणपत पिंगळा, गोमा पिंगळा, कमलाकर गडखळ, लक्ष्मण लोबी, हरी पिंगळा, यशवंत पिंगळा, चिमा पिंगळा, निलेश शिद, चंदू पिंगळा, चांग्या लेंडी, हच्या पिंगळा, गोमा लोभी, मधुकर पिंगळा, गंगाराम मेंगाळ, कृष्णा गडखळ, नांगू लेडी, दिलीप पिंगळा, मंगळा पिंगळा,प्रितेश पिंगळा, मोरेश्वर वारगुडे, रुपेश पिंगळा, जयवंत गडखळ, सनील सिद् , तुषार पिंगळा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे.
ह्या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित वरंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुधीर चेरकर, अनंत औचटकर, पांडुरंग लेंडी, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश पालकर,अलिबाग मंडल सोशल मीडिया संयोजक अमित म्हात्रे, दिनेश पाटील,अलिबाग मंडल युवा मोर्चा चिटणीस, प्रथमेश मांजरेकर, जयवंत ठाकूर, सोपान झावरे, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवींद्र म्हात्रे, झिराड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महेश माने, आदिनाथ सानेकर, रमाकांत औचटकर, राकेश औचटकर हे मान्यवर उपस्थित होते.