दिलीप भोईर(छोटमशेठ ) यांच्याकडून हायमास्ट दिव्याची भेट!
अलिबाग (धनंजय कवठेकर) : आपली सांस्कृतिक परंपरा निष्ठेने जपणाऱ्या मानीच्या भहिरेश्वर गोविंदा पथकाला सराव करतांना कोणतीही अडचण येऊ नये या उद्देशाने माजी सामाजकल्याण सभापती तथा, दक्षिण रायगड जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ यांनी स्वखर्चाने हायमास्ट दिवा बसवून दिला. या हायमास्ट दिव्याचे छोटमशेठ यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील मानी येथील भहिरेश्वर गोविंदा पथकाची स्थापना २०२१मध्ये करण्यात आली. सुरुवातीला हे पथक फक्त पुरुष गोविंदांचे होते. या पथकाचे अध्यक्षस्थान स्वप्नील सखाराम पाटील भूषवीत आहेत तर दीपक म्हात्रे, सप्रेम म्हात्रे, राकेश माळवी, काशिनाथ म्हात्रे, प्रकाश पाटील, अक्षय पाटील, कपूर म्हात्रे, अनिकेत म्हात्रे, दिग्वेश गावंड आणि सहकारी हे या पथकाच्या वाटचालीत मोलाची भूमिका पार पाडतात.
२०२३मध्ये भहिरेश्वर गोविंदा पथकाच्या महिला गटाची स्थापना झाली. या गटाचे अध्यक्षपदाची जबाबदारी सुमित म्हात्रे संभाळत असून करिष्मा म्हात्रे, दर्शना म्हात्रे, सोनाली म्हात्रे, तेजल म्हात्रे, ऋतिका म्हात्रे, पलक म्हात्रे, परी म्हात्रे, चंदा मोरे, वृंदा म्हात्रे आणि अन्य सहकाऱ्यांची त्यांना उत्तम साथ मिळत आहे.