डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार भगवा सप्ताहनिमित्त डोंबिवलीत शुक्रवार व शनिवार असे दोन दिवसीय रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार रक्तदान शिबिराच्या सुरुवातीला डोंबिवली पश्चिमेकडील शाखेत प्लाझ्मा ब्लड बँक यांच्यामार्फत ९ ते १० ऑगस्ट २०२४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ , उपजिल्हा प्रमुख तात्या माने ,संपर्क संघटिका मृणाल यज्ञेशवरी , डोंबिवली विधानसभा संपर्कप्रमुख प्रकाश वाणी , जिल्हा संघतिका वैशाली दरेकर , शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे , उपशहर प्रमुख, उपशहर संघटक , उपशहर संघतीका, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, वृत्तपत्र विक्रेता सेनेचे सचिन भांगे व मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते. सदर रक्तदान शिबिरासाठी माजी शहर अधिकारी राहुल चौधरी यांनी परिश्रम घेतले.शुक्रवारी पार पडलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे ७० रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या.