याप्रकरणी तीन जणांना अटक
डोंबिवली ( शंकर जाधव ) : दीड वर्षांपासून घरकाम करणाऱ्या नोकराने घरातील लाखोंचा मुद्देमाल चोरल्याची घटना डोंबिवली पश्चिमेकडील राजूनगर परिसरात घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून तीन चोरट्याना अटक करून सहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुंदन म्हात्रे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घरकाम करणारा सागर थापा याने त्याच्या साथीदारासह फिर्यादी यांच्या बिल्डींगचे मेनगेट तोडून व बेडरूममधील कपाटे उचकटून कपाटातील ड्रॉवरमधील सोन्याचे व चांदीचे दागिने, १० विवीध कंपन्यांची घडयाळे, रोख रक्कम भारतीय चलन, डॉलर व युरो अशी एकूण १५,५२,८०७ रुपये मालमत्तेची चोरी केली.
पोलिसांनी तपास करून लीलबहादूर लालबहादूर कामी ( ४५ वर्षे, काम - हेल्पर (चायनीज हॉटेल) व टेकबहादूर जगबहादूर शाही, मुळ गावचा पत्ता नगरपालिका पंचमपुरी, वॉर्ड क्र ११, जिल्हा सुरखेत, देश नेपाळ यास पोस्तूर पोलीस ठाणे, बंगळुरू राज्य कर्नाटक, आणि मनबहादूर रनबहादूर शाही (४५ ) व्यवसाय - हेल्पर, मूळ गावचा पत्ता सागर थापा करार नगरपालिका पंचमपुरी, बॉर्ड क १०, जिल्हा मुर्खेत, वेश नेपाळ यांचा बंगळुरू येथूनअटक केली. अटक आरोपीकडून चोरी केलेल्या मालापैकी १५९ सोन्याचे दागीने. २३० ग्रॅम बोदीच्या वस्तू, विविध कंपन्यांची एकूण ०८ (त्यामध्ये भारतीय चलनाच्या व परकीय चलनाच्या नोटा व नाणी) अशी एकूण ६,९६.६७ हजार किमतीची मालमत्ता हस्तगत केला आहे.