गौरी ट्युशन, रेनबो प्री स्कूल नांदिवलीने पाठविल्या सैनिकांना राख्या

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  आपले सैनिक दिवस रात्र ऊन-थंडी-पाऊस सहन करीत भारतमातेचे आपल्या भारतीयांचे रक्षण करीत असतो. याच भावनेतून आपल्या सैनिकाला "तू एकटा नाहीस, आम्ही ही तुझ्या सोबत आहोत" या बंधू प्रेमाच्या भावनेतून दरवर्षी प्रमाणे यंदा ही गौरी ट्युशन आणि रेनबो प्री स्कूल नांदिवली डोंबिवली यांनी पंजाब आणि तेलंगणा येथील स्थित आर्मी आणि एअरफोर्स ठिकाणी २७६५ इतक्या राख्या पाठविल्या होत्या. 

गेल्या वर्षी १८५० राख्या कोलकाता व राजस्थान येथे पाठविण्यात आल्याचे गौरी ट्युशनचे संचालक अमित अनिल देवस्थळी आणि गौरी डेंगळे यांनी सांगितले. या कार्यात सहभागी झालेल्या सर्व पालक व मित्रगणांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post