शेकाप, शिवसेनेला (शिंदेगट) सोडचिट्ठी देत ग्रामस्थांचा विकासवादी धोरणाला जनसमर्थन -दिलीप भोईर (छोटमशेठ)
अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : "भारतीय जनता पक्षाच्या विकासवादी धोरणावर आकर्षित होऊन धोंडखार या गावांतील बंधु-भगिनींनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी त्यांचे माझ्यावतीने पक्षात स्वागत केले असून, या ग्रामस्थांच्या भावनांचा पूर्ण आदर राखत, ग्रामविकासाची त्यांची अपेक्षा पूर्णत्वाला नेऊ." अशा शब्दांत दक्षिण रायगडचे भाजप उपाध्यक्ष तथा १९२, अलिबाग-रोहा-मुरूड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ यांनी आपले मत व्यक्त केले. धोंडखार गावदेवी मंदिर प्रांगणात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर ते बोलत होते.
रोहा तालुक्यातील धोंडखार ग्रामपंचायत हद्दीतील धोंडखार, पारंगखार, दिव, गडबल या गावातील २०० हून अधिक ग्रामस्थांनी, दक्षिण रायगड जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष तथा,१९२, अलिबाग-मुरूड-रोहा विधनासभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख दिलीप भोईर (छोटमशेठ) यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते मोतीराम म्हात्रे, गोपीनाथ देवळे, रोहा भाजप उपाध्यक्ष शैलेश रावकर, नितीन तेंडुलकर, जनार्दन खोत, युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर, कोकबन बूथ अध्यक्ष भारत खाडे, संतोष ठाकूर, युवा नेतृत्व भूषण साळवी, शुभम सरदेसाई, तळेखार माजी सरचिटणीस सुदाम वाघिलकर, भाजप विधानसभा सहसंयोजक सुरेश म्हात्रे, साळाव सरपंच वैभव कांबळे, स्वप्निल चव्हाण, आदिनाथ सानेकर हे मान्यवर उपस्थित होते.